National Web Network India News site- राष्ट्रीय वेब नेटवर्क भारत का समाचार साइट

Cheap Banner AdvertisingAds

उद्या आर.टी. ओ कार्यालय सुरु

सोलापूर  –  उद्या शुक्रवार दिनांक 15 जानेवारी रोजी प्रशासनाने स्थानिक सुटी जाहीर केली आहे. मात्र यादिवशी कच्च्या व पक्क्या लायसन्ससाठी ज्या उमेदवारांना ऑनलाईन अपॉइंटमेंट मिळालेली आहे,  अशा उमेदवारांची गैरसोय होवू नये याकरीता सुटीचा दिवस असूनही या दिवशी कार्यालय सुरु राहील. असे उप प्रादेशिक परिवहन  कार्यालयातर्फे पत्रकाद्वारे जाहिर करण्यात आले आहे.

[DIO Solapur]

एकत्र येऊया, महाराष्ट्र स्वच्छ करुया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : स्वच्छ महाराष्ट्र अभियान हे आता अभियान न राहता लोकचळवळ झाली आहे. आपण सर्व एकत्रित येऊया आणि महाराष्ट्र स्वच्छ करुया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या ट्विटर आणि फेसबुक पेजचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत साकार करण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेतला आहे. राज्यातील 19 शहरे संपूर्ण हागणदारी मुक्त झाली असून अजून 30 शहरांची वाटचाल हागणदारी मुक्तीकडे सुरु आहे. पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सगळे हातात हात घालून एकत्रित येऊया आणि आपला देश, आपले राज्य स्वच्छ करुया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे ट्विटर twitter.com/@SwachhMahaआणि www.facebook.com/SwachhMaha या पेजचा प्रारंभ करण्यात आला.
[DGIPR]

शिधापत्रिका निवासी पुरावा म्हणून ग्राहय न धरण्याबाबत आवाहन

सोलापूर : शिधापत्रिकेचा वापर शिधावस्तूंसाठी केला जातो. विविध दाखले मिळविण्यासाठी अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालयांत निवासी पुरावा म्हणून शिधापत्रिकेची मागीणी केली जाते. मात्र, शिधापत्रिका निवासी पुरावा म्हणून ग्राहय धरु नये, असे अन्न व नागरी पुरवठा विभागाने एका पत्रकान्वये स्पष्ट केले आहे.

दूरध्वनी जोडणी, घरगुती गॅस जोडणी, बँकेत खाते उघडणे, पॅन कार्ड काढणे, पारपत्र मिळविणे, वाहन चालविण्याचा परवाना मिळविणे, रुग्णालयात दाखल करणे, शाळा, महाविद्यालयांत प्रवेश अशा अनेक कारणांसाठी अर्जदारांकडून शिधापत्रिकेची मागणी करण्यात येते. पुरवठा विभागाकडून शिधापत्रिका देताना केवळ अर्जदाराने दिलेल्या पत्त्यावर राहतो किंवा कसे, एवढीच जुजबी चौकशी केली जाते.

अर्जदाराचे राहण्याचे ठिकाण कायदेशीर आहे किंवा कसे, तसेच तो पक्क्या घरात राहतो की झोपडपट्टीत, या बाबी पाहिल्या जात नाहीत. संबंधित व्यक्ती किंवा त्यांचे कुटुंब दिलेल्या पत्यावर प्रत्यक्ष राहत नसले, तरी शिधापत्रिकेचा नियमित वापर होणे शक्य आहे. शिधावस्तु नेण्यासाठी स्वत: कुटुंबप्रमुखानेच आले पाहिजे, असे बंधन नाही. अशा परिस्थितीत शिधापत्रिकेचा वापर हा निवासाचा पुरावा होऊ शकत नाही.

शासनाने 5 जून 2010 रोजी प्रसिध्द केलेल्या परिपत्रकात शिधापत्रिकांचा वापर निवासी पुरावा म्हणून ग्राहय धरु नये, अशा सूचना दिल्या आहेत. तसा उल्लेख शिधापत्रिकेवरही केलेला आहे. मात्र, अजूनही ब-याच कार्यालयांकडून प्राधिकरणांकडून निवासाच्या पुराव्यासाठी शिधापत्रिकांची मागणी केली जात असल्याचे शासनाच्या निर्दशनास आले आहे. त्या अनुषंगाने अन्न, नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने शिधापत्रिकांचा निवासी पुरावा म्हणून वापर करु नये, असे आपल्या पत्रकात म्हटले आहे
[DIO Solapur]

माहिती अधिकार कायद्यामध्ये महाराष्ट्र अग्रस्थानी – मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड

सोलापूर : माहिती अधिकार हा क्रांतिकारक कायदा आहे. यामध्ये देशात महाराष्ट्र पुढे असून याअंतर्गत सर्वात जास्त अर्ज राज्यात येतात असे प्रतिपादन राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी केले.

येथील शासकीय विश्रामगृहात माहिती अधिकार अधिनियमाबाबतच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, पोलीस आयुक्त रविंद्र सेनगांवकर, पोलीस अधीक्षक वीरेश प्रभु, मनपा आयुक्त विजय काळम – पाटील, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना मुख्य माहिती आयुक्त श्री गायकवाड म्हणाले की, ब्रिटीश काळापासून गोपनीय कायद्याची संस्कृती सुरु झाली. आता या कायद्यामुळे पारदर्शक कारभाराची संस्कृती सुरु झाली आहे. त्यामूळे मानसिकता बदलण्याची गरज आहे शासन व्यवहार शक्यतो कागदावरच असतो त्यामूळे जशी आहे तशी माहिती त्वरित व परिपूर्ण दिली पाहिजे असे प्रतिपादन केले.

या कायद्यांतर्गत स्वत: हून नियमातील तरतूदीनुसार माहिती जाहीर करण्यामध्ये पुढाकार घ्यावा. अर्जदाराला माहिती वेळेत मिळाली पाहिजे. जावक कक्षात माहिती प्रलंबित राहणार नाही याची खात्री करावी तसेच जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांच्या कामाबाबत श्री. गायकवाड यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे अधिका-यांच्या शंका जाणून घेवून मार्गदर्शन केले.

जिल्ह्यात जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे हे लोकशाही दिनाच्या दिवशी याबाबत विशेष लक्ष देवून नियमित आढावा घेत असल्याबद्दल समाधान व्यक्त करुन अभिनंदन केले. या बैठकीला जिल्हास्तरीय वरिष्ट अधिकारी उपस्थित होते.
[DIO Solapur]

PM greets the Nation on New Year

New Delhi : Prime Minister Shri Narendra Modi has extended his New Year greetings to the nation.

“As the year 2016 begins, my greetings and good wishes to everyone. May 2016 bring joy, peace, prosperity and good health in everyone’s lives,” the Prime Minister said.
[PIB]

लोकसहभागाच्या आवाहनास उत्स्फुर्त प्रतिसाद, जागर सभेच्या लोकसहभागातून 3 कोटी 44 लाखाची कामे – मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे

सोलापूर  :  जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जागर सभेच्यामाध्यमातून अकरा तालूक्यात लोकसहभागातून 3 कोटी 44 लाख 29 हजाराची कामे झाली आहेत.  राज्यात लोक वर्गणीच्या माध्यमातुन 3 कोटीच्या घरात साहित्य आणि रक्कम जमा करणारी सोलापूर जिल्हा परिषद पहिली ठरली आहे. जागर सभेच्या आवाहनाला जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यात गाव पातळीवर प्राथमिक शाळांमध्ये जागरसभा घेण्यात आल्या. या सभेस पालक, शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ यांना लोकसहभागासाठी आवाहन करण्यात आले. माहे  सप्टेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातुन ही लोकवर्गणी गोळा करण्यात आली. सदर लोक वर्गणीमध्ये 1 कोटी 50 लक्ष रोख रक्कम उर्वरित सगंणक, कपाट, बोअर (विंधन विहिरी) पाईपलाईन, इलेक्ट्रीक मोटारी, विद्युम काम, रंगरंगोटी, वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्य अशी एकूण 3 कोटी 44 लाख 29 हजार रुपयांचे साहित्य व रक्कमेच्या स्वरुपात जमा करण्यात आले.

राज्यात लोक वर्गणीच्या माध्यमातुन 3 कोटीच्या घरात साहित्य आणि रक्कम जमा करणारी सोलापूर जिल्हा परिषद पहिली ठरली आहे. जागर सभेच्या आवाहनाला जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे. शिक्षण विभागाने ISO शाळा, डिजीटल व ई-लर्निंग उपक्रम, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरण प्रभावीपणे राबविण्याचे काम केलेले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी या मोहिमेस प्रारंभ केला. शाळा स्तरावर स्वत: जाऊन आवाहन केले. त्यांच्या आवाहनास शिक्षण विभागाने भरघोस प्रतिसाद दिला आहे.

31 मार्च पर्यंत ही मोहिम राबविण्यात येणार आहे. किमान 1 कोटीपर्यंत साहित्य व रक्कम जमा करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले होते. त्यास 3 पट प्रतिसाद मिळाला आहे. पंढरपुर गट शिक्षणाधिकारी सुलभा वटारे यांनी 40 लक्ष, अरुण फडके, मोहोळ यांनी 40 लक्ष, गजानन गनबावडे, माळशिरस यांनी 40 लक्ष रुपये जमा केलेअसल्याची माहिती श्री. डोंगरे यांनी दिली.
[DIO Solapur]

 Page 1 of 797  1  2  3  4  5 » ...  Last » 

NWN Ads

Archive

  • D-653
  • President

District Portals

NWN Ads